रिझर्व्ह बॅंकच दोषी

पीटीआय
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी मुख्य दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांनी रिझर्व्ह बॅंकेला जबाबदार धरले आहे. या गैरव्यवहाराच्या काळात रिझर्व्ह बॅंकेकडून योग्य लेखापरीक्षण झाले नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. 

‘पीएनबी’ गैरव्यवहाराचा तपास विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असून, यावर केंद्रीय दक्षता आयुक्तांची देखरेख आहे. या पार्श्‍वभूमीवर चौधरी म्हणाले, की लेखापरीक्षणाची आणखी सक्षम व्यवस्था आणण्याची आवश्‍यकता आहे.रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांचे योग्य लेखापरीक्षण केले नाही. बॅंकिंग क्षेत्रावरील नियामकाची जबाबदारी रिझर्व्ह बॅंकेवर आहे; परंतु ही जबाबदारी योग्यरीतीने पार पाडण्यात आलेली नाही.  

जोखीम आणि धोके यांची तपासणी करण्यासाठी काही निकष असणे आवश्‍यक असतात. या निकषांच्या आधारे त्यांनी लेखापरीक्षण करणे गरजेचे आहे; परंतु या गैरव्यवहाराच्या काळात असे कोणतेही लेखापरीक्षण झालेले दिसत नाही, असे चौधरी यांनी नमूद केले.

जोखीम आणि धोक्‍यांचे परीक्षण करण्याचे काम रिझर्व्ह बॅंकेकडून व्हायला हवे. ते वेळोवेळी होत असेल, तर गैरव्यवहार का उघडकीस आला नाही? 
- के. व्ही. चौधरी, मुख्य दक्षता आयुक्त

Web Title: arthavishwa news reserve bank gulity