रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी रिझर्व्ह बॅंकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. या अधिकाऱ्यांमध्ये एक मुख्य सरव्यवस्थापक आणि सरव्यवस्थापक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  सोने आयातीच्या ८०ः२० योजनेप्रकरणी ही चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात जाणूनबुजून काणाडोळा करण्यात आला का, हे सीबीआयच्या पथकाने या वेळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’द्वारे ‘पीएनबी’मध्ये झालेल्या सुमारे १३ हजार ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी सीबीआयने दोन गुन्हे नोंदविले आहेत. 

Web Title: arthavishwa news reserve bank officer inquiry