रबर उद्योगाला प्रोत्साहनाची गरज

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

निर्यातीला चालना देण्यासाठी मंडळ देण्याची उद्योगविश्‍वाची मागणी

मुंबई - वाहन, सुरक्षा, आरोग्यसेवा, कृषी आणि इतर क्षेत्रांमध्ये महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या रब्बर उद्योगाची झपाट्याने वाढ होत आहे. रबर उद्योगात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजक गुंतले आहेत. भांडवली गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची मोठी क्षमता असलेल्या रबर उद्योगासाठी स्वतंत्र निर्यात प्रोत्साहन मंडळ स्थापन केल्यास रब्बर निर्यातीला चालना मिळेल, असा विश्‍वास ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनने व्यक्त केला आहे. 

‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’ या उपक्रमांमुळे रबर उद्योगातील व्यावसायिक संधी वाढल्या आहेत. मात्र कुशल मनुष्यबळाचा अभाव आणि आयात करासंबंधीच्या अनियमिततेने स्थानिक उत्पादकांना फटका सहन करावा लागत असल्याचे ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एआयआरआयए) वरिष्ठ उपाध्यक्ष विक्रम माकर यांनी सांगितले. रबर उद्योगला संरक्षक कवच आणि रबर उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने १९४५ मध्ये ‘एआयआरआयए‘ची स्थापना केली. देशभरात या संघटनेचे १३०० हून अधिक सदस्य आहेत. 

रबर उद्योगात २० लाखांहून अधिक आणि रब्बर प्लांटेशनमध्ये १० लाखांहून अधिक लोक काम करतात. कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीडी) अंतर्गत ‘एआयआरआयए‘ आणि ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफक्‍चर्स असोसिएशन (एटीएमए) सोबत रबर स्कील डेव्हलपमेंट कौन्सिलची स्थापना केली आहे.

या वेळी विष्णू भीमराजका आणि विनोद पाटकोटवार उपस्थित होते. रबराची निर्यात वाढवण्यासाठी ‘एआयआरआयए‘ने केंद्र सरकारकडे स्वतंत्र रब्बर एक्‍सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (रबेक्‍सील) स्थापण्याविषयी विचारणा केली. त्यामुळे रबर उत्पादनाला चालना मिळेल, अशी माहिती माकर यांनी दिली. 

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन फॉर्म्युलेशन व ऑटोमेशनला गती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भारताची रबर निर्यात १.४८ टक्के इतकी असून, चीनचा मात्र ११ टक्के वाटा आहे. उत्पादन वाढ आणि निर्यात मंडळ असल्यास पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये रबर उत्पादनांची निर्यात पाच टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

रबर उद्योगाचा आवाका 
भारत तिसरा मोठा रब्बर उत्पादक 
३५ हजार रब्बर उत्पादनांची निर्मिती 
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांचे वर्चस्व 
३० लाख रोजगार 
७५ हजार कोटींची बाजारपेठ 
४० टक्के उत्पादनांची निर्यात 
भारत जगातील दुसरा मोठा ग्राहक

Web Title: arthavishwa news Rubber industry needs to be promoted