सारस्वत बॅंकेचे क्रेडिट कार्ड लवकरच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - सुशासन आणि सर्वोत्तम सेवेच्या जोरावर सहकार क्षेत्रात अग्रगण्य स्थान निर्माण करणाऱ्या सारस्वत को- ऑपरेटिव्ह बॅंकेला क्रेडिट कार्ड वितरणाची परवानगी मिळाली आहे. यंदा बॅंकेचे शतक महोत्सवी वर्ष असून या सोहळ्यामध्ये बॅंकेच्या क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्डचे अनावरण होणार आहे. सहकार क्षेत्रात क्रेडिट कार्ड इश्‍यू करणारी सारस्वत ही दुसरी बॅंक ठरली आहे. 

गेल्या काही वर्षात सारस्वतची बॅंकिंग उद्योगाच्या तुलनेत दमदार कामगिरी केली आहे. दरवर्षी सरासरी तीन लाख ग्राहक वाढत असल्याचे सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सांगितले. तंत्रज्ञावर आधारित सेवेला प्राधान्य देत डिजिटल बॅंकिंगवर बॅंकेचा भर आहे. वन पेज बॅंकिंगसारखी सुविधा देणारी सारस्वत एकमेव सहकारी बॅंक असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. वाणिज्य बॅंकांप्रमाणे सारस्वत बॅंकेच्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. बॅंकेकडून एकाच वेळी क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड लवकरच इश्‍यू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: arthavishwa news saraswat bank credit card soon