एसबीआयचे गृहकर्ज किंचित स्वस्त

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - भारतीय स्टेट बॅंकेने कर्जाचा आधार दर ०.३० टक्‍क्‍याने कमी करून ग्राहकांना नव्या वर्षातली कर्जस्वस्ताईची भेट दिली आहे. या कपातीने आधार दर ८.९५ टक्‍क्‍यांवरून ८.६५ टक्के झाला आहे. कर्जाचा प्रमुख आधार दर (बीपीएलआर) १३.७० टक्‍क्‍यांवरून १३.४० टक्के करण्यात आला आहे. आधार दराशी संलग्न केलेल्या ग्राहकांवरील मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे.

नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या किंवा ‘एसबीआय’कडे गृहकर्ज हस्तांतर करणाऱ्या ग्राहकांसाठी कर्ज प्रक्रिया शुल्कावरील सवलत ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, बॅंकिंगमध्ये ‘एसबीआय’चा सर्वात कमी आधार दर असून, इतर बॅंकांकडून त्याचे अनुकरण करण्याची शक्‍यता आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकेने व्याजदराचा आढावा घेतला. ठेवीं दरांनुसार आधार दरात ०.३० टक्‍क्‍याची कपात करून तो ८.६५ टक्के करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘एसबीआय’च्या रिटेल बॅंकिंगचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले. बॅंकेचे जवळपास ८० लाख ग्राहकांनी जुन्या कर्जदराने कर्ज घेतलेली असून, त्यांना या कपातीचा फायदा होईल, असे गुप्ता यांनी सांगितले. ‘एमसीएलआर’मध्ये परावर्तित न झालेल्या कर्जदारांना आधार दरातील कपात फायदेशीर ठरेल. एमसीएलआर आणि आधार दरामधील तफावतदेखील यामुळे काही प्रमाणात भरून निघेल, असे गुप्ता यांनी सांगितले. व्याजदर कमी करण्याबरोबरच बॅंकेने प्रक्रिया शुल्कावरील सवलत योजना ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. 

विद्यार्थ्यांना फायदा
दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणाऱ्या गृहकर्जदारांना आणि शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्याजदर कपातीचा फायदा होणार आहे. गृहकर्ज सर्वसाधारणपणे १५ ते २० वर्षांसाठी दिले जाते. त्याचबरोबर शैक्षणिक कर्ज दीर्घ कालावधीसाठी दिले जाते.

Web Title: arthavishwa news sbi home loan rate decrease