सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विकासदरवाढीचा आशावाद असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता. २६) शेअर बाजारात जोरदार खरेदी केली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३०३.६० अंशांच्या वाढीसह ३४,४४५ अंशांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीही ९१.५५ अंशांच्या वाढीसह १०,५८२ अंशांवर बंद झाला. 

अमेरिकेतल्या वॉलस्ट्रीटवरील तेजीचे पडसाद सकाळी आशियातील प्रमुख बाजारांवर उमटले. मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर उंचावेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबरच्या तिमाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असेही संस्थेचे म्हणणे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी महत्त्वाच्या शेअर्सची खरेदी केली. भांडवली वस्तू, पायाभूत सेवा, धातू, तेल व वायू, ऊर्जा क्षेत्रांत खरेदीचा ट्रेंड दिसून आला. ‘आयटी’ व ‘टेक्‍नॉलॉजी’ या क्षेत्रात विक्री दिसून आली.

Web Title: arthavishwa news sensex