सेन्सेक्‍स 34 हजारांजवळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - भारताच्या विकासदराबाबत ‘एडीबी‘चा अंदाज आणि जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ११) शेअर बाजारात उलाथापालथ दिसून आली. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सेन्सेक्‍समध्ये घसरण झाली. मात्र अखेरच्या तासातील खरेदीने निर्देशांक सावरला. दिवसअखेर तो ६० अंशांच्या वाढीसह ३३ हजार ९४०.४४ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १४.९० अंशांची वाढ झाली व तो १० हजार ४१७.१५ वर बंद झाला. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा पवित्रा कायम आहे. त्यामुळे सलग पाचव्या सत्रात निर्देशांकात वाढ नोंदविण्यात आली होते.

Web Title: arthavishwa news sensex