सेन्सेक्‍स पुन्हा ३५ हजारांवर

पीटीआय
मंगळवार, 8 मे 2018

मुंबई - जागतिक पातळीवर घसरणीचे चित्र असतानाही गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर वाढल्याने शेअर बाजारात सोमवारी तेजी निर्माण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २९२ अंशांनी वाढून ३५ हजार २०८ अंश या तीन महिन्यांतील उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही १० हजार ७०० अंशांची पातळी ओलांडली. 

सेन्सेक्‍स आज ३५ हजार २५९ अंश या दिवसभरातील उच्चांकी पातळीवर पोचला. नंतर त्यात थोडी घसरण झाली. अखेर तो मागील सत्राच्या तुलनेत २९२ अंशांनी वधारून ३५ हजार २०८ अंशांवर बंद झाला. ही सेन्सेक्‍सची १ फेब्रुवारीनंतरची उच्चांकी पातळी आहे. त्या वेळी निर्देशांक ३५ हजार ९०६ अंशांवर बंद झाला होता. मागील दोन सत्रांत निर्देशांकात २६१ अंशांची घसरण झाली होती. निफ्टी आज ९७ अंशांनी वधारून १० हजार ७१५ अंशांवर बंद झाला. 

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारविषयक चर्चा, अमेरिकेतील रोजगाराची समाधानकारक आकडेवारी यामुळे फेडरल रिझर्व्हकडून दरवाढ होण्याची शक्‍यता कमी झाली आहे. याचा परिणाम होऊन वॉल स्ट्रीटवर तेजी निर्माण झाली. मात्र, या तेजीचा फारसा परिणाम न होता आशियाई शेअर बाजारांमध्ये आज संमिश्र वातावरण होते.

सेन्सेक्‍सची पातळी
1 फेब्रुवारी ३५,९०६ 
7 मे  ३5,208

वॉल स्ट्रीटवरील शुक्रवारच्या सत्रातील तेजीचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर सुरू आहे. कच्च्या तेलाच्या भावातील वाढीचा परिणाम आगामी काळात होईल. 
- आनंद जेम्स, चीफ मार्केट स्ट्रॅटेजिस्ट, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

Web Title: arthavishwa news sensex on 35000