सेन्सेक्‍स गडगडला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - सौदी अरेबियातील अस्थिरतेनंतर खनिज तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंगळवारी उमटले. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍सने ५०० अंशांची डुबकी घेतली.

दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६० अंशांच्या घसरणीसह ३३,३७०.७६ अंशांवर बंद झाला. निफ्टी १०१.६५ अंशांच्या घसरणीसह १०,३५०.१५ अंशांवर स्थिरावला. 

आयटी निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये आज उतरती कळा होती. निफ्टीच्या फार्मा निर्देशांकात ४.३ टक्के, ऑटो निर्देशांकात १.२ टक्के, मेटल निर्देशांकात १.७ टक्के आणि पीएसयू बॅंक निर्देशांकात ४ टक्‍क्‍यांची घसरण नोंदवण्यात आली. बीएसईचा कॅपिटल गुड्‌स निर्देशांक १.१ टक्के, कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांक २ टक्के आणि ऑइल अँड गॅस निर्देशांकात १.३ टक्‍क्‍यांची घसरण झाली. बीएसईमध्ये लुपिन १६.९ टक्के, सिप्ला ७.२५ टक्के, एसबीआय ३.६ टक्के, भारती एअरटेल ३.४ टक्के, यूएलएल २.९ टक्के, भेल ५.८ टक्के आणि टाटा मोटर्स डीव्हीआर ३.५ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह बंद झाला.

लुपिनच्या शेअरची आपटी 
फार्मा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या लुपिनला अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (यूएसएफडीए) गोवा आणि मध्य प्रदेशातील प्रकल्पाला नोटीस बजावण्यात आली आहे. परिणामी आज मुंबई शेअर बाजारात लुपिनचा शेअर १७ टक्‍क्‍यांनी कोसळला होता. रुपयामध्ये ३५ पैशांचे अवमूल्यन 
रुपयामध्ये मंगळवारी डॉलरच्या तुलनेत ३५ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ६५.०३ च्या पातळीवर बंद झाला. आयातदारांनी डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने रुपयाला झळ बसली.

Web Title: arthavishwa news sensex