शेवटच्या सत्रात सेन्सेक्‍स सावरला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

मुंबई - गुजरात निवडणुकांच्या एक्‍झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाची ग्वाही देण्यात आल्यामुळे शेअर बाजारात शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स १९३.६६ अंशांनी वधारला आणि ३३ हजार २४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ५९.१५ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार २५२.१० वर बंद झाला. 

गेल्या दोन सत्रांत सेन्सेक्‍सने ४०२ अंश गमावले होते. मात्र आज स्टॅंडर्ड चार्टर्ड या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात विकासदर ७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे बाजारातील वातावरण सकारात्मक बनले. मात्र नोव्हेंबरमधील घाऊक महागाईने गुंतवणूकदारांच्या खरेदीला ब्रेक बसला. मिडकॅपमध्ये खरेदी दिसून आली, तर स्मॉलकॅप निर्देशांक घसरला. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. त्याखालोखाल सिप्ला, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरोमोटो कॉर्प, ॲक्‍सिस बॅंक, लुपिन, कोटक बॅंकेच्या शेअर्समध्ये वाढ झाली. टीसीएस, सन फार्मा, पॉवरग्रीड, एल अँड टी आदी शेअर घसरणीसह बंद झाले. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी बुधवारी ५७८ कोटींची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ११६ कोटींची विक्री केल्याचे शेअर बाजाराने म्हटले आहे.

Web Title: arthavishwa news sensex control in last session