‘सेन्सेक्‍स’मध्ये किरकोळ घसरण

पीटीआय
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

मुंबई - जागतिक पातळीवरील चिंताजनक आर्थिक वातावरण आणि रुपयातील घसरण याचा फटका शेअर बाजाराला गुरुवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समध्ये २५ अंशांची घसरण होऊन तो ३३ हजार ८१९ अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीची १४ अंशांची घसरण होऊन तो १० हजार ३८२ अंशांवर बंद झाला. 

रिझर्व्ह बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत चलनवाढीचा आलेख चढता राहण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, आर्थिक स्थिती सुधारण्याबाबतही बैठकीत अनिश्‍चितता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले. पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यापासून परकी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून निधी काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: arthavishwa news sensex decrease