सेन्सेक्‍समधील तेजी सुरूच

पीटीआय
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - शेअर बाजारात सुरू असलेली तेजी सलग चौथ्या सत्रात मंगळवारी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ९२ अंशांनी वधारून ३३ हजार ८८० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक २२ अंशांची वाढ होऊन १० हजार ४०२ अंशांवर बंद झाला. 

चीनने अर्थव्यवस्था आणखी खुली करण्यासह काही वस्तूंच्या आयातीवरील कर कमी करण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे आशियाई आणि युरोपी शेअर बाजारांसह वॉल स्ट्रीटवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले. याचाच परिणाम होऊन देशांतर्गत शेअर बाजारांमध्ये तेजी कायम राहिली. सेन्सेक्‍स ९१ अंशांच्या वाढीसह ३३ हजार ८८० अंशांवर बंद झाला.

Web Title: arthavishwa news sensex increase