सेन्सेक्समध्ये वाढ, निफ्टीत घट
मुंबई - शेअर बाजारात दिवसभर मोठ्या-प्रमाणावर चढ-उतार पाहावयास मिळाले. दिवसअखेर निफ्टी १३.७५ अंशांच्या घसरणीसह १०,०७९ अंशांवर बंद झाला तरी मात्र सेन्सेक्स २७.७५ अंशांच्या वाढीसह ३१ हजार १८६ अंशांवर बंद झाला.

किरकोळ महागाई पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोचल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली होती. तसेच उत्तर कोरियाचा दबाव निवळल्यानंतर जगभरात खरेदीचा ट्रेंड दिसून येत असला, तरी स्थानिक बाजारात खरेदीचे चित्र दिसले नाही. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये आज विक्रीचा मारा सुरू होता. क्षेत्रीय पातळीवर एफएमसीजी, मेटल, ऑटो, रिअल्टी, ऑइल अँड गॅस, कॅपिटल गुड्स आणि कंझ्युमर ड्यूरेबल्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली. फार्मा कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र वाढ झाली.
बाजारातील वातावरण सर्वकालिक उच्चांकावर पोचले असताना अस्थिरता निर्माण होणे साहजिक आहे. आशियातील बहुतांशी बाजार हे संमिश्र अवस्थेत बंद झाले आहेत.
- विनोद नायर, प्रमुख संशोधक, जिओजीत परिबास सर्व्हिस लि.