सेन्सेक्‍स, निफ्टीची किरकोळ घसरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

मुंबई - रोज नवे उच्चांक निर्माण करणाऱ्या शेअर बाजाराच्या मंचावर आज ‘क्षणभर विश्रांती’चे चित्र पहायला मिळाले. दिवसाअखेर सेन्सेक्‍स १० अंशांच्या किरकोळ घसरणीसह ३४,४३३.०७  अंशांवर बंद झाला, निफ्टी ४.८० अंशांच्या घसरणीसह १०,६३२.२० अंशांवर स्थिरावला.

केंद्र सरकारने आज सिंगल ब्रॅंड रिटेल ट्रेडिंग १०० टक्के एफडीआयला मंजुरी दिल्यामुळे त्याच्याशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. क्षेत्रीय पातळीवर बॅंकिंग, ऑटो, फार्मा, कॅपिटल गुड्‌स, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि कॅपिटल गुड्‌स कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा मारा सुरू होता. बॅंक निफ्टी ०.३ टक्‍क्‍याच्या किरकोळ घसरणीसह २५ हजार ६१७ अंशांवर बंद झाला.

Web Title: arthavishwa news sensex nifty decrease