शेअर बाजारातील तेजीला ‘ब्रेक’
मुंबई - शेअर बाजारात मागील तीन सत्रांत सुरू असलेली तेजी नफेखोरीमुळे गुरुवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७३ अंशांची घसरण होऊन ३५ हजार २४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २५ अंशांची घसरण होऊन १० हजार ७१६ अंशांवर बंद झाला.
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींनी गुंतवणूकदार धास्तावले आहेत. कच्च्या तेलाचा भाव आज प्रतिबॅरल ७७.७६ डॉलर होता.

रुपयातील घसरण, खनिज तेलाचे वाढते भाव आणि कंपन्यांचे निकाल फारसे सकारात्मक नसल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले.
- विनोद नायर, मुख्य विश्लेषक, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस