शेअर बाजारातील तेजीला ‘ब्रेक’

पीटीआय
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहार आणखी सुमारे तेराशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे मंगळवारी वातावरण निर्माण झाले. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी बॅंकांच्या समभगांच्या विक्रीचा सपाटा लावला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ९९ अंशांची घट होऊन ३४ हजार ३४६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही २८ अंशांच्या घसरणीसह १० हजार ५५४ अंशांवर बंद झाला.  

तिसऱ्या तिमाहीत एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) आणि इतर आर्थिक आकडेवारीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याचा अंदाज शेअर दलालांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘पीएनबी’च्या समभागाने १२ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह २० महिन्यांचा नीचांक गाठला. शिवाय गीतांजली जेम्सच्या समभागामध्ये ५ टक्‍क्‍यांची घट झाली. ‘पीएनबी’तील गैरव्यवहार उघड झाल्यापासून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: arthavishwa news share market