शेअर बाजार तेजीत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - कंपन्यांच्या तिमाही निकालांबाबत आशावादी असलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीने गुरुवारी (ता. ११) नवा उच्चांक नोंदवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ७०.४२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ५०३ अंशांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीत १९ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ६५१ अंशांवर बंद झाला.

रियल्टी, आयटी, एफएमसीजी, हेल्थकेअर आदी क्षेत्रात खरेदी दिसून आली. तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू, पीएसयू या क्षेत्रात विक्रीचा मारा दिसून आला. भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बॅंक, आयटीसी, डॉ. रेड्डीज लॅब, ओएनजीसी आदी शेअर वधारले. आयसीआयसीआय, विप्रो, ॲक्‍सिस बॅंक, टीसीएस, पॉवरग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आदी शेअर घसरणीसह बंद झाले. इंड्‌सइंड बॅंकेच्या शेअरमध्ये २.०८ टक्‍क्‍याची घट झाली. डिसेंबरच्या तिमाहीत बॅंकेला नफा मिळाला असला, तरी गुंतवणूकदारांनी बॅंकेच्या शेअरची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी बाजारात ६०० कोटींची खरेदी केली; मात्र परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५७२ कोटींची विक्री केल्याचे शेअर बाजाराने म्हटले आहे.

एकीकडे महागाई वाढण्याची शक्‍यता असली तरी ब्लुचिप कंपन्या तिमाहीमध्ये चांगली कामगिरी करतील, या अपेक्षेने गुंतवणूकदार खरेदीला प्राधान्य देत असल्याचे जिओजित फायानान्शिअल सर्व्हिसेचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arthavishwa news share market