शेअर बाजाराची घोडदौड सुरूच

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

मुंबई - बॅंका व आयटी शेअर्समधील खरेदीचा ओघ कायम राहिल्याने बुधवारी मुंबई निर्देशांक (सेन्सेक्‍स) व निफ्टीने आणखी एक नवा उच्चांक स्थापन केला. दिवसअखेर सेन्सेक्‍स २१.६६ अंशांच्या वाढीसह ३६ हजार १६१.६४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २.३० अंशांची किरकोळ वाढ झाली, तो ११ हजार ८६ अंशांवर बंद झाला. 

वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी नफेखोरी दिसली; मात्र बॅंकांच्या शेअर्समधील खरेदीने बाजारातील तेजी कायम राहिली. सेन्सेक्‍स मंचावर एसबीआयच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. अदानी पोर्ट, येस बॅंक, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, एचडीएफसी, सन फार्मा, बजाज ऑटो, इन्फोसिस आदी शेअर वधारले. 

जिओच्या नव्या ऑफरचा धसका घेत गुंतवणूकदारांनी दूरसंपर्क सेवा पुरवठादार इतर कंपन्यांच्या शेअर्सची विक्री केली. ज्यामुळे एअरटेल, रिलायन्स कम्युनिकेशन, टाटा टेलिसर्व्हिसेस, रिलायन्स कम्युनिकेशन आदी शेअर घसरणीसह बंद झाले.

Web Title: arthavishwa news share market