पतधाेरणामुळे वाढली शेअर बाजाराची पत

पीटीआय
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) पतधोरणात स्थिर ठेवलेले व्याजदर आणि चलनवाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९६ अंशांची वाढ होऊन १० हजार ३२५ अंशांवर बंद झाला. 

रिझर्व्ह बॅंकेने द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. याचबरोबर किरकोळ चलनवाढीचा अंदाज कमी केला आहे. तसेच, आर्थिक विकासाचा वेग वाढण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.

याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. देशभरात सरासरीएवढा मॉन्सून पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केल्याचाही चांगला परिणाम शेअर बाजारावर झाला. यातच जागतिक पातळीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाची भीती काही प्रमाणात कमी झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह होता.  

सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. निर्देशांकात १२ मार्चनंतर झालेली ही सर्वाधिक वाढ ठरली आहे. त्या वेळी निर्देशांक ६१० अंशांनी वधारला होता. कालच्या सत्रात सेन्सेक्‍समध्ये ३१५ अंशांची घसरण झाली होती. निफ्टी आज १९६ अंशांची उसळी घेऊन १० हजार ३२५ अंशांवर बंद झाला. 

तेजीची कारणे 
    अमेरिका-चीन व्यापार युद्धाची भीती कमी 
    मॉन्सूनच्या चांगल्या अंदाजाने उत्साहाचे वातावरण 
    रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर स्थिर 
    आर्थिक विकासाचा वेग वाढण्याचा अंदाज 
    चलनवाढीचा वेग मंदावण्याची शक्‍यता 

सेन्सेक्‍स ३३,५९६    (+577) 
निफ्टी १०,३२५    (+196) 

Web Title: arthavishwa news share market Credit cards