शेअर बाजारात तेजी कायम

शेअर बाजारात तेजी कायम

मुंबई - वाहन उत्पादक कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीची लाट कायम राहिली. दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ ४५.६३ अंशांनी वधारून ३३,७३१.१९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त मात्र किरकोळ घट झाली आणि तो १०,४५१.८० अंशांवर स्थिरावला. 

वर्ल्ड बॅंकेच्या ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’मधील भारताची सुधारलेली कामगिरी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात तेजीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्रात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, अशोक लेलॅंड, महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस आदी शेअर वधारले. ऑटोबरोबरच आयटी आणि रिॲल्टी क्षेत्रात खरेदी दिसून आली. ओएनजीसी, टायटन, सिप्ला, टीसीएस, विप्रो, अदानी, एसबीआय, एचडीएफसी आदी शेअरमध्ये वाढ झाली. दमदार तिमाही निकालांनी ‘टायटन’च्या शेअरने १९ टक्‍क्‍यांची झेप घेतली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ९६९० कोटींची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र ३३.४० कोटींचे शेअर खरेदी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com