शेअर बाजारामध्ये नवे उच्चांक

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - शेअर बाजार बांधकाम, ऊर्जा व एफएमसीजी क्षेत्रातील सकारात्मकतेमुळे मंगळवारी ९०.४० अंशांनी वधारून ३४ हजार ४४३.१९ पातळीवर व्यवहार करत बंद झाला. निफ्टीही १३ अंशांनी वधारून १०,६३७ पातळीवर स्थिरावला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मात्र उत्साहाची कमतरता होती. क्षेत्रीय पातळीवर आज एफएमसीजी, रिअल्टी आणि कन्झ्युमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये खरेदीचा जोर होता. रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक म्हणजे ३ टक्‍क्‍यांनी वधारला होता. त्यापाठोपाठ कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी ०.८ आणि ०.५ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाले. 

आज मुंबई शेअर बाजारात कोल इंडिया, येस बॅंक, विप्रो, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे शेअर्स प्रत्येकी ५.८-१.३ टक्‍क्‍यांनी वधारून बंद झाले. तर आयशर मोटर्स, हिंदाल्को, भारती इन्फ्राटेल, भेल, भारती एअरटेल, अदानी पोर्टस, हीरो मोटो आणि सन फार्माच्या शेअर्समध्ये प्रत्येकी २.३ ते ०.९ टक्‍क्‍यांची घसरण नोंदविण्यात आली.

Web Title: arthavishwa news share market new record