शेअर बाजारात नफावसुली सुरूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

मुंबई - आखाती देशांतील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा धडाका लावत नफावसुली केली. यामुळे बुधवारी (ता. ८) सेन्सेक्‍समध्ये १५१.९५ अंशांची घट होत ३३,२१८.८१ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ४७ अंशांच्या घसरणीसह १०,३०३.१५ वर बंद झाला. 

सौदी अरेबियातील अस्थिरता आणि खनिज तेलाच्या वाढत्या किमतींनी अनिश्‍चिततेचे वातावरण गडद झाले आहे. गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य देत नफावसुली सुरू केल्याचे शेअर दलालांनी सांगितले. तेल आणि वायू, दूरसंपर्क आणि बांधकाम क्षेत्रात विक्रीचा सपाटा दिसून आला. खनिज तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम महागाई वाढण्यास होण्याची शक्‍यता असल्याने गुंतवणूकदार नफावसुली करत असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. 

शेअर बाजाराच्या माहितीनुसार मंगळवारी बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४६१.४७ कोटींची खरेदी केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र २ हजार कोटींचे शेअर विक्री केले. आजच्या सत्रात भारती एअरटेलच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. त्याखालोखाल टाटा मोटर्स, एसबीआय, लुपिन, आयसीआयसीआय बॅंक, हिरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, डॉ. रेड्डी लॅब, एचडीएफसी, ओएनजीसी, अदानी, इन्फोसिस, विप्रो, टाटा स्टील, आयटीसी आदी शेअर घसरले. ॲक्‍सिस, एशियन पेंट, सिप्ला, सन फार्मा, कोल इंडिया, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, टीसीएस आदी शेअरमध्ये खरेदी दिसून आली.

Web Title: arthavishwa news share market profit recovery