लघू आणि मध्यम उद्योगातील कंपन्यांची कोटींची उड्डाणे

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नवी दिल्ली - शेअर बाजारातील पोषक वातावरणाचा फायदा घेत लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रातील कंपन्यांनी ‘एसएमई‘ मंचावरून १ हजार ७८५ कोटींचे भांडवल उभारले आहे. बीएसई आणि एनएसईच्या विशेष ‘एसएमई‘ मंचावर २०१७ मध्ये तब्बल १३२ कंपन्या सूचीबद्ध झाल्या असून, यात गुजरातमधील सर्वाधिक ५१ एसएमईंचा समावेश आहे. 

विस्तार, भांडवली गरज पूर्ण करण्यासाठी लघू आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांनी ‘आयपीओ‘चा मार्ग स्वीकारला आहे. गेल्या वर्षभरात १३२ कंपन्यांनी एसएमई मंचावरून १ हजार ७८५ कोटींचा निधी उभारला. प्रत्येक कंपनीने सरासरी १३ कोटी ४२ लाखांचा निधी उभारला. त्याआधीच्या वर्षात ६६ कंपन्यांनी ५४० कोटींचा निधी उभारला होता. यामध्ये तब्बल तीन पटीने वाढ झाली आहे. एसएमई कंपन्यांना भांडवलपूर्ततेचा हा सर्वांत सोपा मार्ग आहे. २०१८ मध्ये हा ट्रेंड कायम राहील, असे पॅंटोमॅथ ॲडव्हाजरीचे व्यवस्थापकीय संचालक महावीर लुनावत यांनी सांगितले. 

भांडवल उभारणी करणाऱ्या एसएमई कंपन्यामध्ये गुजरातमधील कंपन्यांची संख्या सर्वाधिक आहे. गेल्या वर्षात गुजरातमधील ५१ कंपन्यांनी आयपीओ आणले. त्याखालोखाल महाराष्ट्रातील ३९ कंपन्या, मध्य प्रदेशातील ११, दिल्लीमधील ८ आणि राजस्थानातील ६ कंपन्यांचा समावेश आहे.

Web Title: arthavishwa news Small and Medium Enterprises Companies capital