देशातील प्रमुख राज्यांना पुरामुळे ‘बुरे दिन’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - देशाच्या एकूण देशाअंतर्गत उत्पादनात (जीडीपी) २७ टक्के हिसा उचलणारी राज्ये सध्या पूरग्रस्त असल्याची बाब मुख्य लेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालात समोर आली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्‍चिम बंगाल व गुजरात या देशातील प्रमुख राज्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. केंद्राच्या निधीचा योग्य उपयोग न झाल्याने व आपत्ती व्यवस्थानाअंतर्गत पूर व्यवस्थापनाची योग्य अंमलबजावणी न झाल्याने या राज्यांना नुकसान सोसावे लागत आहेत. प्रत्येक वर्षी पूरस्थितीचा सामना कराव्या लागणाऱ्या राज्यांमधील अनेक प्रकल्प रखडल्याची स्थिती आहे, असे ‘कॅग’ने सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. 

Web Title: arthavishwa news states bad day by flood