संशयास्पद व्यवहारांच्या नोटिसा ३१ मेपर्यंत पाठवा - सीबीडीटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बॅंक खात्यात मोठ्या प्रमाणात रोकड जमा करणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागाला दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीडीटीने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा मध्यवर्ती कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये नोटाबंदीनंतर निर्माण झालेला काळा पैसा शोधण्यासाठी आणि कर संकलनात वाढ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाला वेगाने कार्यवाही करण्याची सूचना केली आहे.

नोटांबदीनंतर बॅंक खात्यात मोठ्या प्रमाणात रोकड जमा करणाऱ्यांना नोटिसा पाठविण्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ३१ मार्चपूर्वी पाठविण्यात आलेल्या नोटिसांची पुढील कार्यवाही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

संशयास्पद प्रकरणे १७.७३ लाख 
बॅंक खाती  २३.२२ लाख 
व्यवहार ३.६८  लाख कोटी रुपये 

Web Title: arthavishwa news suspected transaction notice cbtd