टाटा मोटर्सने नेतृत्व करावे - रतन टाटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे/मुंबई - टाटा मोटर्सवर जेव्हा अपयशी कंपनीचा शिक्का मारला जातो तेव्हा अतिशय दु:ख होते, अशी भावना टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी व्यक्त केली. पाच वर्षांनंतर पुण्यातील उत्पादन प्रकल्पाला सोमवारी (ता.२) रतन टाटा यांनी भेट दिली. या वेळी टाटा यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. टाटा मोटर्समध्ये प्रचंड क्षमता असून, कंपनीने अनुकरण न करता नेतृत्व करावे, असे आवाहन टाटा यांनी कर्मचाऱ्यांना केले. या वेळी त्यांच्यासोबत टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन उपस्थित होते.

गेल्या चार ते पाच वर्षांत कंपनीने बाजारातील स्थान गमावले आहे. याचे आपल्याला प्रचंड दु:ख असल्याचे टाटा यांनी सांगितले. आपल्याकडे प्रचंड उत्साह आणि क्षमता आहे. हाच उत्साह आणि क्षमता आता एकत्र पाहून आपल्याला आनंद झाल्याचे टाटा यांनी सांगितले. आपण जे काही ठरवू त्यात निश्‍चित यशस्वी होऊ इतकी आपली क्षमता आहे. इतरांचे अनुकरण न करता आपण नेतृत्व करण्याच्यादृष्टीने स्वत:ला विकसित केले पाहिजे, असे टाटा यांनी सांगितले. प्रत्येक कर्मचाऱ्याला टाटा मोटर्सचा अभिमान असला पाहिजे. चंद्रशेखरन आणि गुंटेर यांच्या नेतृत्वात आपण भविष्यात आघाडीवर राहू, असा विश्‍वास रतन टाटा यांनी व्यक्त केला.

Web Title: arthavishwa news tata motors ratan tata