कंपनी लवादाचा टाटा सन्सला झटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - टाटा समूहातील मनमानी आणि गैरव्यवहाराविरोधात दाद मागणाऱ्या सायसर मिस्त्री यांना राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाने दिलासा दिला आहे. मिस्त्री यांच्या दोन कंपन्यांची तक्रार दाखल करून घेत लवादाने टाटा सन्सला गुरुवारी (ता. २१) झटका दिला आहे. लवादाच्या मुंबई खंडपीठाला याबाबत टाटा सन्सला नोटीस बजाविण्याची सूचना अपिलीय लवादाने दिली आहे. 

लवादाने सुरवातीला मिस्त्री यांच्या याचिका फेटाळून लावल्या, मात्र त्याविरोधात मिस्त्री यांनी अपिल दाखल केला. दरम्यान, अपिलीय लवादाने तीन महिन्यांत तक्रार निकालात काढण्याच्या सूचना मुंबई खंडपीठाला दिल्या आहेत.

या संदर्भात बोलताना टाटा सन्सचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री म्हणाले की, ‘‘टाटा ग्रुपच्या संस्थापकांना अभिप्रेत असलेल्या मूल्यांच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. हा वारसा जपण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करू. टाटा सन्समध्ये चालविलेल्या मुस्कटदाबी आणि गैरव्यवहाराविरोधातील लढा यापुढे चालूच राहील.’’

Web Title: arthavishwa news tata sons