टाटा टेलिसर्व्हिसेस बंद होणार

पीटीआय
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई - टाटा सन्सच्या सहयोगी कंपनी असणाऱ्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’ ही दूरसंचार कंपनी बंद होणार आहे. यासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. कंपनीकडून पाचशे कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

टाटा टेलिसर्व्हिसेसमध्ये कायम कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांची नोटीस देण्यात आली आहे. त्याआधी कंपनी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात येणार आहे; तसेच काही कर्मचाऱ्यांसमोर स्वेच्छानिवृत्तीचे (व्हीआरएस) प्रस्तावही ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. टाटा टेलिसर्व्हिसेसमधील मोजक्‍या कर्मचाऱ्यांना समूहातील इतर कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. 

कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज 
कंपनीवर सध्या ३४ हजार कोटींचे कर्ज असून, दूरसंचार क्षेत्रातील सहभागीदार कंपनी डोकोमोने भागिदारी संपुष्टात आणल्याने कंपनीच्या तोट्यात भर पडली. सध्याची दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणं टाटा टेलिसर्व्हिसेससाठी खूपच कठीण आहे. त्यामुळे कंपनीच्या अस्तित्वासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार व्यवस्थापनाकडून होत होता. मात्र परिस्थिती फारशी अनुकूल नसल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: arthavishwa news tata teleservices close