प्रत्यक्ष करसंकलनात १८.२ टक्‍क्‍यांनी वाढ

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

नवी दिल्ली - केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर या आर्थिक कालावधीदरम्यान ६.५ लाख कोटी रुपयांचा कर जमा केला असून, करसंकलनात १८.२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. सध्याचे प्रत्यक्ष करसंकलन एकूण अर्थसंकल्पाच्या ६७ टक्के असून, २०१७-१८ साठी प्रत्यक्ष करासाठीचे अंदाजित अर्थसंकल्प ९.८ लाख कोटी रुपयांचा आहे. 

प्रत्यक्ष करसंकलनात प्राप्तिकरदात्यांनी भरलेला कर, व्यवसाय कर व संपत्ती कर यांचा समावेश असतो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये १.२ लाख कोटी रुपयांचे करपरतावे सादर करण्यात आले आहेत. करपरताव्यांचा विचार करता एकूण करसंकलन १२.६ टक्‍क्‍यांनी म्हणजेच ७.६८ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. 

याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात माहिती देण्यात आली आहे. डिसेंबर २०१७ अखेरीसच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार एकूण करसंकलन ६.५६ लाख कोटी असून, ही मागील वर्षाच्या करसंकलनापेक्षा हे करसंकलन १८.२ टक्‍क्‍यांनी जास्त असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे. व्यावसायिकांकडून देण्यात येणाऱ्या आगाऊ करात (ॲडव्हान्स टॅक्‍स) १०.९ टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून, वैयक्तिक प्राप्तिकर संकलनही २१.६ टक्‍क्‍यांनी वाढले असल्याची माहिती अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षामध्ये करसंकलनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार ८.४७ लाख कोटी रुपयांचे अंदाजित करसंकलनाचे उद्दिष्ट आखून देण्यात आले होते. सध्याच्या आकडेवारीनुसार अंदाजित आकडेवारीनुसार ८.४७ लाख कोटी करसंकलनाचे उद्दिष्ट असताना ८.४९ लाख कोटींचे करसंकलन झाले असल्याची माहिती अर्थमंत्रालयाने दिली. प्रत्यक्ष करसंकलनातील वाढ ही सकारात्मक असल्याचेही परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: arthavishwa news tax collection