राजर्षि शाहू सहकारी बॅंक तीन पुरस्कारांनी सन्मानित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - बॅंकिंग फ्रंटिअर्स यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या बॅंकांना फ्रंटिअर्स इन को-ऑप. बॅंकिंग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार येथील राजर्षि शाहू सहकारी बॅंकेस २०१६-२०१७ साठीचे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट ॲवार्ड, बेस्ट ग्रीन इनिशिएटीव्ह पेपरलेस ॲवार्ड, बेस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह एनर्जी ॲवार्ड अशा एकूण तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

हे तीनही पुरस्कार जयपूर (राजस्थान) येथे नुकतेच प्रदान करण्यात आले. या वेळी बॅंकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे, उपाध्यक्ष सुधाकरराव पन्हाळे, संचालक बाळासाहेब जगताप, शिवाजीराव वाडकर, शांताराम धनकवडे, दिलीप शिंदे, पद्‌माकर पवार, अभय मोहिते, सचिन पन्हाळे, सुदाम झेंडे, सतीश नाईक, संचालिका कमल व्यवहारे, मंगला जाधव, कुसुम अडसुळे, स्वीकृत तज्ज्ञ संचालक बाळासाहेब अमराळे व बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पासलकर उपस्थित होते.

बॅंकेचे अध्यक्ष शिंदे यांनी सांगितले, की गेली १५ वर्षे अतिशय चांगले नियोजन करून आमच्या बॅंकेने ‘नेट एनपीए’चे प्रमाण शून्य टक्के राखले आहे, तर ‘ग्रॉस एनपीए’ हादेखील गेली सलग तीन वर्षे तीन टक्‍क्‍यांच्या आत असून, मार्च २०१७ ला स्टॅंडर्ड कर्जवितरणाचे प्रमाण ९७.२५ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये बॅंकेस निव्वळ नफा रु. ८ कोटी २५ लाख झाला असून, सभासदांना १३ टक्के लाभांशवाटप केले आहे.

Web Title: arthavishwa news three award to rajashree shahu co-operative bank