वाहनांच्या इंजिन सुरक्षेसाठी ‘टोटल हाय पर्फ’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

मुंबई - ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंट उत्पादक टोटल ऑइल इंडिया या कंपनीने मोटारसायकल ऑइल श्रेणीमध्ये ‘टोटल हाय पर्फ’ ही ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंटचे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. टोटलच्या मोटो रेसिंगमधील व्यापक संशोधनातून ‘टोटल हाय पर्फ’ ही ल्युब्रिकंट्‌स उच्च श्रेणी तयार करण्यात आली आहे.

मुंबई - ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंट उत्पादक टोटल ऑइल इंडिया या कंपनीने मोटारसायकल ऑइल श्रेणीमध्ये ‘टोटल हाय पर्फ’ ही ऑटोमोटिव्ह ल्युब्रिकंटचे नवे उत्पादन बाजारात आणले आहे. टोटलच्या मोटो रेसिंगमधील व्यापक संशोधनातून ‘टोटल हाय पर्फ’ ही ल्युब्रिकंट्‌स उच्च श्रेणी तयार करण्यात आली आहे. शहरांमध्ये गर्दीच्या ठिकाणी मोटारसायकल चालवताना अचानक ब्रेक लावणे, सतत गियर बदलणे, क्‍लचचा सातत्याने उपयोग करावा लागतो, या परिस्थितीत इंजिनाची कार्यक्षमता कमी होते.‘टोटल हाय पर्फ’मुळे सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांच्या इंजिनच्या सुरक्षेबरोबरच आरामदायी राईडची चालकाला अनुभव देईल, असा दावा टोटल ऑइल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप वासवानी यांनी केला. दळणवळण साधने विकसित होत असून आणि दरडोई उत्पन्न वाढल्यामुळे भारतात दुचाकी बाजारपेठेत मोठ्या संधी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: arthavishwa news total hi purf for vehicle engine security