‘उबर इट्‌स’ आता पुण्यातही सादर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे - लोकांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांशी जोडणारे ‘उबर इट्‌स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी ॲप आता पुणे शहरातही सादर करण्यात आले आहे. तीनशे रेस्टॉरंटशी भागीदारी करून पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या भागांचा समावेश आहे. आता पुणेकरांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ त्यांच्या आवडत्या विविध रेस्टॉरंटमधून घरबसल्या मागविता येणार आहेत. या संदर्भात उबर इट्‌स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड म्हणाले, की सात शहरांमध्ये यशस्वी झाल्यानंतर, आता ‘उबर इट्‌स’ने पुणे शहरात प्रवेश केला आहे.

पुणे - लोकांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थांशी जोडणारे ‘उबर इट्‌स’ हे ऑन डिमांड फूड डिलिव्हरी ॲप आता पुणे शहरातही सादर करण्यात आले आहे. तीनशे रेस्टॉरंटशी भागीदारी करून पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांना खाद्यसेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यात विमाननगर, कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि संगमवाडी या भागांचा समावेश आहे. आता पुणेकरांना त्यांचे आवडते खाद्यपदार्थ त्यांच्या आवडत्या विविध रेस्टॉरंटमधून घरबसल्या मागविता येणार आहेत. या संदर्भात उबर इट्‌स इंडियाचे प्रमुख भाविक राठोड म्हणाले, की सात शहरांमध्ये यशस्वी झाल्यानंतर, आता ‘उबर इट्‌स’ने पुणे शहरात प्रवेश केला आहे. पुणे शहर हे महाविद्यालये व कॉर्पोरेटचे माहेरघर असल्याने पुणे शहरात हे ॲप सादर करताना आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे. आमचे भागीदार आणि उबर डिलिव्हरी नेटवर्कच्या मदतीने पुणेकरांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठीचे उत्तम अन्न पुरविणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: arthavishwa news ubereats its in pune

टॅग्स