अपयश लपविण्यासाठी मूर्ती लक्ष्य - बालकृष्णन

पीटीआय
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

बंगळूर - इन्फोसिसचे संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्याला सहसंस्थापक एन. आर. नारायणमूर्ती जबाबदार असल्याचे सांगत स्वत:चे अपयश लपवीत असल्याचा आरोप इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) व्ही. बालकृष्णन यांनी केला आहे. मूर्ती यांचा कंपनीतील प्रभाव कमी होत असल्याचेही बालकृष्णन यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय बाजार निर्देशांकाच्या (एनएसई) प्रमुख दहा व्यावसायिक कंपन्यांच्या यादीतून इन्फोसिसला वगळण्यात आले आहे. प्रमुख दहा श्रीमंत कंपन्यांच्या यादीत इन्फोसिसची जागा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने घेतली आहे. इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या समभागांना जोरदार फटका बसला होता. ‘एनएसई’च्या प्रमुख दहा कंपन्यांच्या यादीतून इन्फोसिस बाहेर पडली आहे. तसेच बॉम्बे स्टॉक एक्‍सेंज अर्थात ‘बीएसई’ सेन्सेक्‍सच्या मंचावरील प्रमुख दहा कंपन्यांच्या यादीतील स्थानही इन्फोसिसने गमावले आहे. दरम्‍यान, गुंतवणूकदारांना  आर्थिक फटका बसल्‍यामुळे इन्‍फोसिसच्‍या कामगिरीवर सेबीचे लक्ष ठेवणार असल्‍याचे समजते.

Web Title: arthavishwa news v. balkrishnan talking