‘लायटिंग’ क्षेत्रात ‘विप्रो’चे नवे तंत्रज्ञान

‘लायटिंग’ क्षेत्रात ‘विप्रो’चे नवे तंत्रज्ञान

पुणे - विप्रो लायटिंगने पुण्यात आयोजित केलेल्या ‘लाइट शो’मध्ये इंटरनेट ऑफ लायटिंग (आयओएल) सादर केले. कंपनीने ‘लायटिंग’ क्षेत्रात आणलेल्या नव्या डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे घरगुती आणि औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होणार असून, जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार आहेत. मोदी सरकारने हाती घेतलेल्या महत्त्वाकांशी स्मार्ट सिटींमध्ये ‘ह्यूमन सेंटरिक लायटिंग सोल्यूशन’ उपलब्ध करण्यासाठी ‘विप्रो’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘सिस्को’सारख्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

शिवाय स्मार्ट तंत्रज्ञानामुळे शहरांमध्ये सार्वजनिक सुरक्षा आणि शहरातील बाह्य प्रकाशयोजनांचे नियंत्रण करता येणे शक्‍य आहे. या संदर्भात विप्रो कमर्शियल लायटिंग बिझनेसचे उपाध्यक्ष आणि व्यवसायप्रमुख अनुज धीर म्हणाले, ‘‘विप्रो लायटिंगने चांगल्या दर्जाची उत्पादने, सेवा आणि नव्या संकल्पना ग्राहकांपर्यंत पोचविल्या आहेत. भविष्यात आणखी नवी उत्पादने आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सर्वोत्तम साधने उपलब्ध करून दिली जातील. त्याचेच पहिले पाऊल म्हणून आम्ही आता ‘इंटरनेट ऑफ लायटिंग’ आणले आहे. ’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com