अरुण जेटली पुन्हा अर्थमंत्रालयात

वृत्तसंस्था
Friday, 15 February 2019

नवी दिल्ली: गेले काही महिने कामकाजापासून लांब असलेल्या अरुण जेटली यांनी आज पुन्हा केंद्रीय अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. राष्ट्रपती भवनातून या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे. जेटली यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ते  या पदावरून पायउतार झाले होते. त्यानंतर या पदाचा कार्यभार रेल्वे व कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आला होता. पुलवामा आतंकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलविलेल्या पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीला ते आज उपस्थित होते.  

वैयक्तिक शस्त्रक्रियेच्या कारणास्तव अमेरिकेला जावे लागणार असल्याने अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांनी अर्थ खात्याचा पदभार सोडला होता. यानंतर हंगामी अर्थमंत्री म्हणून पियुष गोयल यांनी अर्थ खात्याची जबाबदारी पार पाडली. महत्वाचे म्हणजे, मागील 8 महिन्यात हंगामी अर्थमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्याची पियुष गोयल यांची ही दुसरी वेळ होती. या अगोदर एप्रिल महिन्यात अरुण जेटली यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेली असताना गोयल यांनी 100 दिवसांसाठी अर्थ खात्याची सूत्रे स्वीकारली होती. पदभार स्वीकारल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी नियोजित रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला ते संबोधित करतील. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley resumes charge of finance ministry