भट्टाचार्य ‘विप्रो’च्या संचालक मंडळावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

बंगळुरू - माहिती तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोने भारतीय स्टेट बॅंकेच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची संचालक म्हणून नियुक्‍ती केली आहे. जानेवारीपासून भट्टाचार्य विप्रोच्या स्वतंत्र संचालक असतील. त्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा राहील, असे कंपनीने म्हटले आहे. 

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच भट्टाचार्य यांची संचालकपदी नियुक्‍ती केली होती. देशात आणि जगभर ख्याती मिळवलेल्या कंपनीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. कंपनीच्या वृद्धीत योगदान देण्यास आतूर असल्याचे भट्टाचार्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. भट्टाचार्य यांचा वित्तसेवा क्षेत्रातील दांडगा अनुभव आणि तंत्रज्ञानाची समज या बाबी विप्रोसाठी पोषक ठरतील, असा विश्‍वास विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arundhati Bhattacharya Wipro Director