क्रिप्टो जाहिरातींवर ASCI चे कठोर गाइडलाइन्स! काय आहेत जाणून घ्या

जाहिरातींवरील गाईडलाईन्स 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील
Cripto
CriptoSakal

एडव्हरटायजिंग स्टँडर्ड काउंसिल ऑफ इंडियाने (ASCI) व्हर्चुअल डिजिटल ऍसेटसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्यात. ASCI ही देशातील जाहिरातींवर (Advertisement) नियंत्रण ठेवणारी सेल्फ रेग्युलेटरी संस्था आहे. आता जाहिरातींवरील गाईडलाईन्स 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. सरकार आणि इतर स्टेकहोल्डर्सशी सल्लामसलत केल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली. जाहिरातींसाठीच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांवर सरकारशी बराच काळ चर्चा सुरू होती. त्यानुसार, क्रिप्टो जाहिरातींनी ग्राहकांना गुंतवणुकीशी संबंधित जोखमींची स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे.

Cripto
व्हॉल्युंटरी प्रोव्हिडंट फंडमधूनही (VPF) वाचवू शकता टॅक्स! कसा ते वाचा ?

गुंतवणुकीशी संबंधित जोखीम सांगणे गरजेचे

ASCI नुसार, क्रिप्टो जाहिरातींसह धोक्याची माहिती दिली जाईल. ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यांपासून दूर ठेवण्यासाठी हे केले जात आहे. तसेच, नफ्याच्या फुगलेल्या दाव्यांवर अलर्ट केले जाऊ शकतात.

गाइडलाइन्स काय आहेत?

-1 एप्रिल 2022 पासून सर्व व्हर्च्युअल डिजिटल ऍसेट-संबंधित जाहिरातींना लागू होणार आहेत. VDA प्रॉडक्ट्स आणि VDA एक्सचेंजेस किंवा VDA चे वैशिष्ट्य असलेल्या सर्व जाहिरातींमध्ये या गाईडलाईन्सचा विचार करुन जाहीराती करणे बंधनकारक असेल. क्रिप्टो आणि एनएफटी ही दोन्ही अनरेग्युलेटेड प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यात जास्त जोखीम असू शकतात.

-VDA प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेज जाहिरातींमध्ये "करेंसी", "सिक्युरिटीज", "कस्टडियन" आणि "डिपॉझिटरी" या शब्दांचा वापर केला जाऊ शकत नाही.

Cripto
Job Alert : Bank Of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी

-एकूण किती खर्च येईल याची स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जाहिरात कोण देत आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी लागेल. सेलिब्रिटींना जाहिरात करण्यापूर्वी धोका समजून घ्यावा लागतो.

-VDA प्रॉडक्ट्सची किंमत किंवा नफा याबद्दल स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जाहिरातींमध्ये स्पष्ट, अचूक, पुरेशी आणि अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, 'झिरो कॉस्ट' मध्ये त्या सर्व खर्चांचा समावेश असणे आवश्यक आहे जेणेकरून ग्राहकाला ऑफर किंवा व्यवहाराशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकेल.

-मागील कामगिरीची माहिती दिली जाणार नाही. 12 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठीचे रिटर्न समाविष्ट केले जाणार नाहीत.

-VDA प्रॉडक्ट्सच्या प्रत्येक जाहिरातीमध्ये जाहिरातदाराचे नाव स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचा सोपा मार्ग देणे आवश्यक आहे (फोन नंबर किंवा ईमेल). ही माहिती ग्राहकांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडली जावी.

-कोणत्याही जाहिरातीमध्ये भविष्यातील नफ्यात वाढ करण्याचे आश्वासन देणारी किंवा हमी देणारी विधाने नसावीत.

-VDA प्रॉडक्ट्सची इतर कोणत्याही रेग्युलेटेड ऍसेटशी तुलना केली जाऊ शकत नाही.

-VDA जाहिरातींमध्ये दिसणार्‍या ख्यातनाम व्यक्तींनी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्थात सेलिब्रिटींनीही सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत अधिक माहिती, अभ्यास याची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही.

Cripto
ऑफिसमध्ये १० तास काम करताना पार दमताय! या प्रकारे व्हा रिफ्रेश

अर्थसंकल्पात मोठे बदल

2022 च्या अर्थसंकल्पात, व्हर्च्युअल डिजिटल ऍसेटबद्दल (VDA) सर्वाधिक चर्चा झाली. व्हर्च्युअल डिजिटल ऍसेटच्या विक्री/हस्तांतरणातून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल, असे बजेटमध्ये सांगितले आले आहे. तसेच, व्हर्च्युअल डिजिटल ऍसेटच्या हस्तांतरणादरम्यान (Transfer), मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांवर एक टक्का टीडीएस आकारला जाईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Cripto
घटस्फोटानंतर ७२ टक्के स्त्रिया ऑनलाईन डेटींगसाठी तयार ! सर्वेक्षणात स्पष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com