गुंतवणुकीची संधी: 'एस्टर डीएम हेल्थकेअर'चा आयपीओ आजपासून खुला 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

हेल्थकेअरमधील कंपनी असलेल्या 'एस्टर डीएम हेल्थकेअर'ची प्राथमिक समभाग विक्री आजपासून (सोमवार ) सुरु झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे.

मुंबई: हेल्थकेअरमधील कंपनी असलेल्या 'एस्टर डीएम हेल्थकेअर'ची प्राथमिक समभाग विक्री आजपासून (सोमवार ) सुरु झाली आहे. पुढील दोन दिवस म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रतिशेअर 180-190 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. आयपीओच्या माध्यमातून 980 कोटी रुपयांचे भांडवल उभारणीचे लक्ष्य ठेवले आहे. 

आयपीओच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग कंपनी कर्जाची परतफेड आणि उपकरण खरेदी करण्यासाठी करणार आहे. एस्टर डीएम हेल्थकेअरची भारताबाहेर गल्फ देशांमध्ये देखील उपस्थिती आहे. युएई,ओमान, सौदी अरेबिया आणि कतारमध्ये कंपनीचा व्यवसाय पसरला आहे. डीएम हेल्थकेअरची 9 देशांमध्ये एकूण 19 रुग्णालये आणि 4,754 खाटा आहेत. 

Web Title: Aster DM Healthcare IPO opens