esakal | सुभाष चंद्र गर्ग ऐवजी आता अतनू चक्रबर्ती आर्थिक व्यवहार सचिवपदी!
sakal

बोलून बातमी शोधा

सुभाष चंद्र गर्ग ऐवजी आता अतनू चक्रबर्ती आर्थिक व्यवहार सचिवपदी!

सुभाष चंद्र गर्ग ऐवजी आता अतनू चक्रबर्ती आर्थिक व्यवहार सचिवपदी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

 नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने अतनू चक्रबर्ती यांची आर्थिक व्यवहार सचिवपदावर नियुक्ती केली आहे. सुभाष चंद्र गर्ग यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. चक्रबर्ती 1985च्या बॅचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. तर गर्ग यांची नियुक्ती आत ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. गर्ग, 1983च्या बॅचचे राजस्थान कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 

जून 2017 मध्ये गर्ग यांची आर्थिक व्यवहार सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. चक्रबर्ती याआधी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता विभागाचे (हा विभाग अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित येतो) सचिव होते. या पदावर आता चक्रबर्ती यांची जबाबदारी अनिल कुमार खाची सांभाळणार आहेत. इतर नेमणूकांमध्ये, भल्ला यांची गृह मंत्रालयाच्या विशेष अधिकारीपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे गृहसचिव राजीव गौबा 31 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यानंतर भल्ला यांची गृहसचिवपदी नियुक्ती होणार आहे. भल्ला हे 1984 च्या बॅंचचे आसाम-मेघालय कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत.

loading image