अनुदानित गॅस सिलिंडर दोन रुपयांनी महाग

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नवी दिल्ली: अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीतील वाढ सलग सातव्या महिन्यात कायम आहे. अनुदानित गॅस सिलिंडर आता 2.07 रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या एका सिलिंडरसाठी  432.71 रुपये मोजावे लागतील. गेल्या महिन्यातदेखील अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

अनुदानावरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने दर महिन्याला अनुदानित गॅस सिलिंडरमध्ये दर महिन्याला दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

दुसरीकडे, जेट इंधनाच्या किंमती मात्र 3.7 टक्क्यांनी घसरल्या आहेत. मागील दोन महिने जेट इंधनाच्या किंमतीत वाढ झाली आहे.  जेट इंधनाची किंमत आता किलोलीटरमागे 1,881 रुपयेएवढी झाली आहे, असे तेल वितरण कंपन्यांनी जाहीर केले.

Web Title: ATF price cut by 3.7%, LPG hiked by Rs 2 per cylinder