ATM मधून पैसे काढणं महागणार; जाणून घ्या डिटेल्स

RBI_ATM
RBI_ATM

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve bank of india)एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत (ATM cash withdrawal rules) काही बदल केले आहे. कोणत्याही बँक ग्राहकाला प्रतिमहा मिळणाऱ्या फ्री एटीएम ट्रांझॅक्‍शन (Free ATM Transaction) नंतर द्यावा लागणाऱ्या शुल्काची कमाल मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. हे शुल्क 20 रुपयांवरुन वाढवून 21 रुपये करण्यात आलं आहे. तसेच मोफत एटीएम ट्रांजेक्शनची नवीन मर्यादा आणि इंटरचार्ज शुल्काचाही (ATM Interchange Fees) समावेश आहे. पाहूयात एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे नियम....

आपल्या बँकेच्या एटीएममधून -

आरबीआयच्या नवीन नियमांनुसार बँक ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून प्रतिमहिना पाच फ्री एटीएम ट्रांझॅक्‍शन करु शकतात. यामध्ये फायनेंशिअयल आणि नॉन-फायनेंशिअल ट्रांझॅक्‍शनचा समावेश आहे. यानंतर एटीएममधून रोकड रक्कम काढत असाल तर शुल्क लागेल.

RBI_ATM
Inspiring Journey : दहावी नापास रिक्षावाला पोहोचला स्वित्झर्लंडला

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून -

जर तुम्ही मेट्रो शहरात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला तीन मोफत ट्रांझॅक्‍शन (फायनेंशिअयल आणि नॉन-फायनेंशिअल) मिळतील. जर छोट्या शहरांमध्ये दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर पाच वेळा मोफत ट्रांझॅक्‍शन (फायनेंशिअयल आणि नॉन-फायनेंशिअल ) मिळेल. आरबीआयने बँकांना मोफत एटीएम ट्रांझॅक्‍शन मर्यादानंतर देवाण-घेवाणीवर शुल्क लावायला परवानगी दिली आहे. हे नवीन नियम एक जानेवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

RBI_ATM
दाढीमुळे कोरोनाचा धोका वाढतो; वाचा कारण

इंटरचेंज शुल्कात वाढ -

आरबीआयनं सांगितलं की, याआधी ऑगस्ट 2012 मध्ये इंटरचेंज शुल्कामध्ये बदल करण्यात आला होता. तर ग्राहकांवर आकरण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये 2014 मध्ये बदल करण्यात आला होता. अशावेळी समितीच्या शिफारसीनंतरच इंटरचेंज फीज आणि कस्टमर चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून खाजगी बँका आणि व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स इंटरचेंज फीज वाढवून 15 रुपयांवरुन 18 रुपये करण्याची मागणी करत होते. केंद्रीय बँकेने गैर-आर्थिक व्यवहारासाठी फी 5 रुपयांवरून 6 रुपये केली आहे, जे 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल. हा आदेश कॅश रीसायकलर मशीनद्वारे केलेल्या व्यवहारांनाही लागू असेल.

RBI_ATM
मुंबई-दिल्लीमध्ये तिसरी लाट नाही, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com