'ऑडी' 9 लाखांनी महागली

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

नवी दिल्ली: लक्झरी कार सेगमेंटमध्ये मोडणारी 'ऑडी' आता महाग झाली आहे. केंद्र सरकारकडून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात आयात करण्यात येणा-या कारवरील शुल्कात वाढ करण्यात आल्याने  'ऑडी' महागणार आहे. कंपनीच्या सर्व मॉडेलच्या किंमती 5 टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्यामुळे किमान 1 लाख रुपये ते 9 लाख रुपयांपर्यंत वाहने महागणार असल्याचे ऑडी इंडियाने म्हटले आहे.

ऑडीकडून सादर करण्यात आलेल्या एसयूव्ही प्रकारातील क्यू 3 किंमत 35.35 लाख रुपये ते स्पोर्ट्स प्रकारातील आर8ची किंमत 2.63 कोटी रुपये आहे. आयात शुल्क आणि सामाजिक कल्याण अधिभार आकारण्यात येणार असल्याने आयात करणा-या वाहनांच्या किमती वाढणार आहेत. 

आयात शुल्काचा कमीत कमी भार ग्राहकांवर पडावा यासाठी आमचा अधिक प्रयत्न आहे. मात्र सरकारने अर्थसंकल्पात आयात शुल्क 10 वरून 15 टक्क्यांवर आणले असल्याने किंमतीत वाढ करण्यात आली आहे.'' असे ऑडी इंडियाचे मुख्य राहिल अंसारी यांनी सांगितले. 

Web Title: Audi to increase price of cars by upto 4%