esakal | ॲक्‍सिस बॅंकेची दोन कोटींची मालमत्ता जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Axis-Bank

चाळीस कोटीच्या नोट्या बदलल्या
मोहित गर्ग, नितीन गुप्ता आणि राजीवसिंग कुशवाह यांनी लोकांकडून जुन्या नोटा स्वीकारल्या आणि त्या बँकेच्या बनावट खात्यांमध्ये जमा केल्याचे ईडीने केलेल्या चौकशीत समोर आले. कमिशन घेत त्यांनी जवळपास ४० कोटींचे जुने चलन बदलून दिले. कुशवाह, विनीत गुप्ता आणि शोबित सिन्हा या तीन बॅंक अधिकाऱ्यांना ईडीने याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर बॅंकेने त्यांना बडतर्फ केले होते. याप्रकरणी नुकतेच ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ॲक्‍सिस बॅंकेची दोन कोटींची मालमत्ता जप्त

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात बनावट खात्यांमध्ये रोकड जमा करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ॲक्‍सिस बॅंकेच्या बडतर्फ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. 

नोटाबंदीच्या काळात ईडीने बॅंकेच्या शाखांमधून एक हजारांच्या तब्बल ३ कोटी ७० लाखांच्या नोटा जप्त केल्या होत्या. दिल्ली पोलिसांच्या ‘एफआयआरनुसार ईडीने बॅंकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी याचिका दाखल केली. बॅंकेचे पुनीत जैन, हेमराज सिंग, विनोद देशमुख, राजीव सिंग कुशवाह, मेहफुज खान, परवेश कुमार गांधी आणि इतर ॲक्‍सिस बॅंक अधिकाऱ्यांची मनी लाँडरिंग प्रतिबंधात्मक कायद्यांअतर्गत मालमत्तेवर टाच आणली असल्याचे ईडीने म्हटले आहे. प्राथमिक जप्ती केलेल्या मालमत्तेचे मूल्य २ कोटी ९५ लाख ९२ हजार ३५१ रुपये आहे. 

loading image