बाबा रामदेव ‘मोदी सरकार’वर नाराज

वृत्तसंस्था
बुधवार, 24 मे 2017

मुंबई: वस्तू आणि सेवाकराअंतर्गत (जीएसटी) आयुर्वेदिक उत्पादनांवर 12 टक्के कर आकाराला जाणार आहे, यावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने नाराजी व्यक्त केली आहे. आयुर्वेदिक उत्पादनांवर लावण्यात येणार्‍या जीएसटी दराबाबत सरकारने पुर्नविचार करावा, यासाठी पत्र लिहिणार असल्याचे पतंजलीचे प्रवक्ता एस. के. तिजारावाला यांनी सांगितले.

सध्या आयुर्वेदिक उत्पादनांवर 5 टक्के कर आकारला जातो. तो जीएसटी लागू झाल्यानंतर 12 टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्याशीसंबधित उत्पादनांवर जास्त कर आकारल्यास 'अच्छे दिन' येणार नाहीत, असेही तिजारावाला म्हणाले. सर्वसामान्य आणि गरीब लोकांना चांगली आणि आरोग्यपूर्ण उत्पादने देण्यासाठी पतंजली कार्य करते. मात्र आता सरकारच्या
या निर्णयामुळे उत्पादनांच्या किंमतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरलेल्या वर्षात पतंजलीची उलाढाल रु.10 हजार 561 कोटींवर पोचली आहे.

एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या डाबरने देखील जीएसटी परिषदेच्या आयुर्वेदिक औषधे आणि उत्पादनांवरील 12 टक्के कराच्या दरांवर निराशा व्यक्त केली आहे. आयुर्वेद उद्योगांवर याचा विपरीत परिणाम होईल, असे डाबर इंडियाचे चीफ फायनान्शियल ऑफिसर ललित मलिक यांनी सांगितले. एफएमसीजी क्षेत्रातील इतर दिग्गज कंपन्या असलेल्या हिंदुस्तान युनिलिव्हर, ईमामी, डाबर यांनी देखील आयुर्वेदिक उत्पादनांवर 12 टक्के जीएसटी आकारण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे.

Web Title: Baba Ramdev angry at Modi's government