बुलंद भारत की बुलंद तस्वीर; बजाजची इलेक्ट्रिक 'चेतक' लाँच; काय आहेत फिचर्स?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

नव्या चेतकमध्ये घोड्याच्या नाळेच्या आकाराचे आकर्षक एलईडी हेडलाईट आणि डिआरएल, अतिशय सेन्सेटीव्ह स्वीचेस देण्यात आले आहेत. यात एनसीए सेल्ससह आयपी67 रेटेड हाय-चेक लिथियम आयन बॅटरी आहे.

नवी दिल्ली : मानवी आकांक्षांना नवे पंख देणारी स्कूटर, अशा शब्दात बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी इलेक्‍ट्रिक "चेतक' स्कूटरचा गौरव केला. डिझाईन, इंजिन, पिकअप, बॅटरी बॅकअप, साधीसोपी चार्जिंग पद्धत, ड्राईव्ह मोडस, इंटेलिजन्स ब्रेकिंग सिस्टिम, मजबूत बांधणी हे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्कूटरची निर्मिती केली आहे, असा दावाही त्यांनी केला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

एअरटेलचा तोटा गगनाला भिडला; वाचा सविस्तर बातमी

"चेतक यात्रे'चे स्वागत
नवी दिल्ली येथे 16 ऑक्‍टोबरला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते "चेतक यात्रे'ला सुरवात झाली होती. त्यानंतर तीन हजार किलोमीटरचा टप्पा पार करत गुरुवारी यात्रा आकुर्डी येथील बजाज ऑटो येथे दाखल झाली. 20 चेतकस्वार यात्रेत सहभागी झाले होते. या यात्रेच्या स्वागतानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांच्यासह मुख्य तंत्रज्ञान अधिकारी अब्राहम जोसेफ, बजाज अर्बनाईटचे अध्यक्ष इरिक वॅस उपस्थित होते. गगनदीप सिंग, सुनील देशपांडे या अधिकाऱ्यांनी चेतकच्या संदर्भातील आपले अनुभव सांगितले.

छोट्या कुटुंबाची बजेट कार

पुन्हा हमारा बजाज
राजीव बजाज म्हणाले, ही स्कूटर सर्वांत लोकप्रिय ठरेल. पर्यावरणपूरक गाडी आहे. गाडीचा लुक, फिनिशिंग, मटेरिअल आकर्षक आहे. चेतकचा बाजारातील खप अतुलनीय असेल, "हमारा बजाज' प्रमाणे आम्ही ही ओळख भारतीयांच्या मनात ठसवणार आहे. गाडी वजनाला हलकी तसेच सस्पेंशन व मायलेज इतर ब्रॅंडच्या तुलनेत अग्रेसर ठरणार आहे. बाजारात ठसठशीत वेगळेपणे दाखविणारी ही क्‍लासिक स्टाईलची बाईक आहे. गाडीचे हेडलाईट, डीआरएल, पृष्ठभाग, एलईडी ब्लिंकर्स अशा विविध वैशिष्ट्यांसह सहा दिमाखदार रंगात ही दुचाकी आहे.

चांद्रयान-2ने पाठविले चंद्रावरील विवराचे फोटो 

काय आहेत फिचर्स?
इलेक्ट्रिक रुपात येण्याआधी चेतकने भारतातील अनेक पिढ्यांमध्ये चेतकला प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आजवर देशभरात 1.3 कोटीहून अधिक चेतक विकल्या गेल्या आहेत. नव्या चेतकमध्ये घोड्याच्या नाळेच्या आकाराचे आकर्षक एलईडी हेडलाईट आणि डिआरएल, अतिशय सेन्सेटीव्ह स्वीचेस देण्यात आले आहेत. यात एनसीए सेल्ससह आयपी67 रेटेड हाय-चेक लिथियम आयन बॅटरी आहे. ही बॅटरी घरगुती 5-15 अॅम्पिअर इलेक्ट्रिक आऊटलेटवही सहज चार्ज होते. 2020 पर्यत नव्या चेतकची निर्यात भारताबाहेर युरोपात करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. सध्या बजाज ऑटो 79 देशांमध्ये आपल्या वाहनांची विक्री करते. या वेळी पत्रकारांशी बोलताना राहुल बजाज यांनी देशातील वाहन उद्योग, इलेक्ट्रिक वाहनांमुळे सध्याच्या अस्तित्वात असलेल्या पारंपारिक बाजारपेठेवर होणारा परिणाम, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली परखड मते मांडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bajaj auto launches electric scooter chetak