शेअर बाजारात घसरतोय; पण 'इथे' मिळतील चांगले 'रिटर्न'

टीम ईसकाळ
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

महागाईला तोंड देत चांगला परतावा मिळवण्यासाठी काही नव्या वाट शोधण्याची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट एफडी हा त्यातीलच एक प्रकार. काही चोखंदळ गुंतवणूकदार या गुंतवणूक प्रकाराचा लाभ घेतही असतात.

शेअर बाजारात सध्या रोजच घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजार, इक्विटी सारख्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पारंपारिक गुंतवणूक प्रकारातील परतावा घटलेला किंवा फारसा आकर्षक नसलेला आहे. सध्या अनेक बॅंका मुदतठेवींवरील व्याजदरांमध्ये कपात करताना दिसून येत आहेत. त्यामुळे महागाईला तोंड देत चांगला परतावा मिळवण्यासाठी काही नव्या वाट शोधण्याची आवश्यकता आहे. कॉर्पोरेट एफडी हा त्यातीलच एक प्रकार. काही चोखंदळ गुंतवणूकदार या गुंतवणूक प्रकाराचा लाभ घेतही असतात.

बहुतांश सर्वसामान्य गुंतवणूकदार यापासून दूर असतात. ज्या प्रमाणे बॅंकेत आपण विशिष्ट कालावधीसाठी मुदतठेव ठेऊन त्यावर व्याज कमावत असतो, त्याचप्रमाणे बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थासुद्धा एफडीवर व्याज देत असतात. या प्रकारच्या चांगल्या रेटिंग असलेल्या नामवंत वित्तीय संस्थेत वेगवेगळ्या पर्यायांपैकी आपल्याला अनुकूल असलेल्या कालावधीसाठी एफडी ठेऊन बॅंकांपेक्षा जास्त व्याजदर मिळवता येतात. त्यासंदर्भातच अधिक सविस्तरपणे जाणून घेऊया. सध्याच्या काळात मुदत ठेवीच उत्तम पर्याय आहे. मात्र ती कशी करावी? किती कालावधीसाठी कुठे करावी हे ठरवणे महत्त्वाचे आहे. मुदत ठेवी म्हणजे fixed deposit (एफडी) मध्ये गुंतवणूक करताना लक्षात घ्यायचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालावधी.

 योग्य कालावधीची निवड करणे हे व्याज दर आणि रोखप्रवाहाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. घसरत्या एफडी व्याज दरात योग्य कालावधीची निवड करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, ज्यामुळे तुम्हाला अधिकाधिक परतावा मिळायला मदत होते. 

तुमच्या मुदत ठेवीचा कालावधी निश्चित करताना 5 गोष्टी लक्षात लक्षात घेतले पाहिजे.

दीर्घ कालावधीकरिता उच्च एफडी व्याजदर
जेव्हा तुम्ही दीर्घ कालावधीकरिता गुंतवणूक करता त्यावेळी अनेक वित्तीय संस्था अधिक व्याज दर देऊ करतात.त्यामुळे व्याज दर एकत्र होऊन तुम्हाला चांगला परतावा कमावण्याची संधी मिळते. उदाहरणार्थ, नियमित गुंतवणूकदारांसाठी बजाज फायनान्सच्या वतीने नव्या ग्राहकांसाठी 12 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 8 टक्के तर 24 महिन्यांच्या मुदत ठेवींसाठी 8.15 टक्के व 36 महिन्यांसाठी 8.60 टक्के व्याज दर निश्चित करण्यात आला आहे, ठेवींचा कालावधी पूर्ण झाल्यावर हे व्याज वळते करण्यात येते. 

याचा तुमच्या परताव्यावर कसा परिणाम होतो? चित्र स्पष्ट होण्याकरिता खालील उदाहरणांवर नजर फिरवा.

No photo description available.  
जर तुम्ही जास्त कालावधीकरिता गुंतवणूक भांडवल ठेवणार असाल तर केवळ तुम्हाला अधिक FD interest rates, (मुदत ठेव व्याज दर) बरोबरचअधिक परतावा देखील मिळतो.

खास कालावधी योजना चांगला परतावा मिळवून देतात
काही बँक किंवा कंपन्या विशेष एफडी योजना देऊ करतात, ज्याद्वारे तुम्हाला विशिष्ट कालावधीसाठी रक्कम गुंतवल्यास तुलनेने अधिक व्याज दर मिळवता येतो. तुम्ही बजाज फिनसर्व्हमध्ये जेव्हा 1 लाख रुपये 15 महिन्यांकरिता गुंतवता तेव्हा तुम्हाला अतिरिक्त 0.05 टक्के दराने
व्याज मिळू शकते. म्हणजेच 8 टक्के व्याज दराच्या जागी तुम्ही 8.05 टक्के व्याज  मिळवू शकता. 

खालील तक्त्याप्रमाणे परताव्याची मजा लुटता येईल:

No photo description available.

वर दाखवलेल्या तक्त्यावरून तुम्हाला हे कळू शकेल की, एखाद्या विशिष्ट मुदत योजनेत गुंतवणूक केल्यास 2,162 रुपये इतके अतिरिक्त व्याज मिळू शकते.

5 वर्षांच्या कर-बचत एफडीवर वाढीव फायदे  
जास्त फायदा मिळविण्याव्यतिरिक्त जर तुम्ही कर बचत करण्याचा विचार करत असाल तर, भारतातील बहुतेक बँका देऊ करत असलेल्या 5 वर्षांच्या कर-बचत एफडीचा विचार केला पाहिजे. 5 वर्षांच्या करबचत मुदत ठेवीचा वापर करून प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार 1.5 लाख रूपयांपर्यंतच्या कर वजावटीचा दावा करू शकता. अर्थात, तुम्ही या एफडीवर आंशिक किंवा मुदत-पूर्व ठेव परत घेऊ शकत नाही आणि प्राप्तिकर   कायद्यानुसार मिळणारे संपूर्ण व्याज हे करपात्र असते.

तुमच्या पैशावर चांगलं व्याज मिळवायचं आहे? मग हा आहे पर्याय 

एफडी कॅल्क्युलेटरमुळे तुमच्या गुंतवणूकीसाठी योग्य कालवधी शोधण्यास तुम्हाला मदत मिळते.  
FD calculator  या ऑनलाईन टूलचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी सुयोग्य एफडी कालावधी निश्चित करू शकता. या कॅल्क्युलेटरमुळे तुम्हाला तुमची मुद्दल आणि कालवधी पूर्ण झाल्यावर मिळणारी एकूण रक्कम यांची खातरजमा करून घेता येते.  ठेवीची रक्कम आणि कालवधीच्या विविध पर्यायांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अपेक्षित उद्दिष्टांशी मिळता-जुळता पर्याय निवडून त्यानुसार गुंतवणूक करू शकता.

एफडीच्या माध्यमातून तुमचा परतावा आणि रोखप्रवाह (लिक्विडीटी) यामध्ये समतोल साधा.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कार खरेदी किंवा व्यवसाय विस्तारासाठी पैशांचा वापर करणे अशा प्रकारच्या आयुष्यातील विविध उद्दीष्टांसाठी बचत करणे हा गुंतवणूक करण्या मागचा एक मुख्य उद्देश असतो. ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खूप आधीपासूनच योजनाबद्ध रितीने गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते. बजाज फायनान्स एफडीमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला मल्टी-डिपॉझीट सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. एकच चेक देऊन तुम्ही 5 एफडींमध्ये गुंतवणूक करू शकता.

या सुविधेचा उपयोग करून नव-गुंतवणूकदार म्हणून तुमची उद्दिष्टे कशी प्राप्त करू शकता ते बघा. 

No photo description available. याप्रकारे, तुम्ही योग्य कालावधी निवडू शकता किंवा अधिक व्याज मिळवून देणाऱ्या  बजाज फायनान्स एफडीमध्ये गुंतवणूक करून देशातील सर्वोत्तम व्याजदराचा लाभ घेऊ शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे,  online  form भरून  25,000 रुपयांपासून म्हणजेच इतक्या कमी रकमेपासून तुम्ही लगेच ऑनलाईन गुंतवणूकीला सुरुवात करू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj finance FDs you can get safe & good retunrs