दिवाळीत तुमच्या FD वर 'इथे' मिळवा दणदणीत व्याज!  

टीम ईसकाळ
Tuesday, 22 October 2019

दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत असेल

दिवाळी आता अगदी उंबरठ्यावर आली आहे. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी या निमित्ताने गुंतवणूक करावी, असे तुम्हाला वाटत  असेल. सणासुदीच्या दिवसात आपण सोने खरेदीवर अधिक भर देतो. हा धातू मौल्यवान आहेच. मात्र, यावर फारसा चांगला परतावा मिळत नाही. शिवाय, सोन्याचे दरही अस्थिर असतात आणि चटकन पूर्ण पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे, सोन्यामध्ये गुंतवणूक करणे टाळा. तर दुसऱ्या बाजूला, फिक्स्ड डिपॉझिट (fixed deposit ) सारख्या पर्यायामध्ये ही सर्व वैशिष्ट्ये आहेत. 'बजाज फायनान्स'सारख्या मान्यताप्राप्त वित्त संस्थेची निवड केल्यास तुम्हाला फारच चांगला परतावा आणि तुमच्या गुंतवणुकीवर अतुलनीय सुरक्षितता मिळण्याची खातरजमाच होते.

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी 'बजाज फायनान्स' एफडीच्या वैशिष्ट्यांवर नजर टाकूया. या वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला खात्रीशीर परतावा मिळेल आणि गुंतवणुकीचा अनुभव वृद्धिंगत होईल.

स्थिर व्याजदर
दिवाळीच्या काळात दर वाढतात, हे खरे आहे. त्यामुळे तुमची गुंतवणूक 'बजाज फायनान्स'च्या  'एफडी'मध्ये वळवण्याचा विचार करा. इथे तुम्हाला अधिक व्याजदर लाभेल. शिवाय, तुमच्या गुंतवणुकीच्या पूर्ण काळात हा दर स्थिर राहतो. इतकेच नाही, या एफडी बाजारपेठेशी संबंधित नसतात. त्यामुळे, परतावा मिळेल की नाही, याची धास्तीही उरत नाही. 

समजा, तुम्ही पाच वर्षांसाठी 1लाख, 2 लाख किंवा 5 लाख गुंतवलेत तर 'बजाज फायनान्स'च्या उच्च परताव्याचा तुम्हाला कसा लाभ होईल, हे पाहूया. 

bajaj

bajaj

मुदतीतील लवचिकता
फिक्स्ड डिपॉझिट तुम्ही हव्या तितक्या मुदतीसाठी ठेवू शकता. अनेक कंपन्या तुम्हाला कमाल पाच वर्षांची मुदत निवडण्याची मुभा देतात आणि या काळात तुम्हाला मिळणारे व्याज घसघशीत असते. गुंतवणुकीचा एक नियम आहे, तुम्ही जितक्या अधिक काळासाठी गुंतवाल तितकी अधिक मिळकत होईल. कारण तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते. म्हणजेच, तुम्ही कमी काळासाठीही चांगला परतावा मिळवू शकता आणि मुदत संपल्यावर पेआऊटचा पर्याय निवडू शकता. तुमच्यापुढे मुदतीचे अनेक पर्याय असल्याने तुमची आर्थिक लक्ष्ये गाठण्याच्या उद्देशाने तुम्ही डीपॉझिट्स ठेवू शकता. शिवाय, तुमच्या गुंतवणुकीत वाढ करणारे आकर्षक  FD interest rates ही मिळवू शकता.

उच्च विश्वासार्हता
एफडी बाजारपेठेतील अस्थिरतेवर अवलंबून नसतात, हे खरे असले तरी तुम्ही निवडलेल्या वित्त संस्थेची विश्वासार्हता महत्त्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तुमची रक्कम वेळोवेळी मिळत रहायला हवी. 'बजाज फायनान्स'च्या बाबतीत कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. या कंपनीला आघाडीच्या एजन्सीसने उच्चतम विश्वासार्हता आणि स्थिरतेचे रेटिंग दिले आहे. 'बजाज फायनान्स'ला आयसीआरएचे एमएएए आणि क्रिसिलचे एफएएए रेटिंग तसेच एसअॅण्डपी ग्लोबलचे '-बीबीबी' रेटिंग आहे. खरे तर, हे रेटिंग मिळवणारी ही एकमेव एनबीएफसी आहे. याचाच अर्थ 16 हजार  कोटींहून अधिक रकमेचे एफडी डिपॉझिट असणाऱ्या 2.5 लाख ग्राहकांच्या सोबतीने तुम्हीही विश्वासाने हे लाभ मिळवू शकता. 'बजाज फायनान्स' योग्य वेळेत पेआऊट करते हे या रेटिंगवरून स्पष्ट होते.

मूल्यवर्धित सेवा
'बजाज फायनान्स' एफडीमध्ये तुम्हाला खात्रीशीर परताव्यासह या प्रक्रियेतील सर्व कामे सहजरित्या करता येतील. उदा. वेगवेगळ्या एफडी करण्यासाठी तुम्ही मल्टि-डिपॉझिट सुविधा वापरू शकता. या सगळ्या एफडीसाठी एकच चेकच वापरता येतो. शिवाय, एफडी घेतानाच ऑटो-रीन्युअलचा पर्याय निवडता येतो. त्यामुळे, मुदत संपल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांशिवाय तुम्हाला सहज पुन्हा गुंतवणूक करता येते. इतकंच नाही, तुम्हाला किती रकम पुन्हा गुंतवायची आहे, हासुद्धा पूर्णपणे तुमचा निर्णय असणार आहे.

याशिवाय, तुम्हाला आर्थिक चणचण भासल्यास ही एफडी मुदतीपूर्वीच तोडता येईल, मल्टि-डिपॉझिट सुविधेमुळे इतर एफडीला हात न लावता एखाद्या एफडीतून पैसे काढता येतील किंवा एफडीवर कर्ज घेता येईल. हा फारच सोयीस्कर पर्याय आहे. कारण, यात तुम्हाला चार लाखांपर्यंत कर्ज घेता येते आणि एफडी सुरक्षित ठेवता येतात.

या वैशिष्ट्यांबरोबरच 'बजाज फायनान्स'चे फिक्स्ड डिपॉझिट्स हा गुंतवणुकीचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे. कारण यातील किमान गुंतवणूक रक्कम आहे फक्त 25000 रुपये त्यामुळे, दिवाळीचा बोनस मिळो अथवा नाही, तुम्ही कसलेले गुंतवणूकदार असाल किंवा नाही, यंदाच्या दिवाळीत गुंतवणूक न करण्याचे कारणच नाही!  filling the online application form इथे अर्ज भरून तुमची गुंतवणूक सुरू करा. तुमच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमचे अधिकृत प्रतिनिधी तुम्हाला फोन करतील.

(डिस्केलमर: गुंतवणूकदारांनी असे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या बँकांविषयी किंवा वित्तसंस्थेविषयी योग्य माहिती घेऊनच स्वतःच्या जबाबदारीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. शिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्या तज्ज्ञ आर्थिक  सल्लागाराची मदत घ्यावी. सकाळ माध्यम समूहाचा गुंतवणुकीच्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही.)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Finance is providing a good interest rate on your FD