30 एप्रिलपर्यंत बॅंक खात्याशी ‘आधार’ जोडा, नाहीतर…

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

बॅंकेत जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या दरम्यान खाते उघडणार्‍या खातेधारकांना पुन्हा बॅंकेकडे किंवा आर्थिक संस्थांकडे आधार क्रमांक आणि 'नो युवर कस्टमर' (केवायसी) तपशील जमा करावा लागणार आहे

नवी दिल्ली: बॅंकेत जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या दरम्यान खाते उघडणार्‍या खातेधारकांना पुन्हा बॅंकेकडे किंवा आर्थिक संस्थांकडे आधार क्रमांक आणि 'नो युवर कस्टमर' (केवायसी) तपशील जमा करावा लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या निर्देशानुसार 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण तपशील बॅंकेला द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे बॅंकेच्या ग्राहकांना 'फॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अॅक्ट'अंतर्गत (एफटीसीए) सर्व कागदपत्रे 30 एप्रिलपर्यंत स्वतः साक्षांकित करावे लागणार आहे.

खातेधारकांनी 30 एप्रिलपर्यंत 2017 माहितीचा तपशील जमा न केल्यास माहिती न देणार्‍या संबंधित खातेधारकांच्या खात्यातील व्यवहार बंद करण्यात येणार आहे.

जुलै 2015 भारत-अमेरिकेदरम्यान अमेरिकी कायदा एफएटीसीएअंतर्गत कर माहितीची देवाण-घेवाण करारावर (टॅक्स इनफॉर्मेशन शेअरिंग) स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. काळ्या पैशाला लगाम बसवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. या करारानुसार भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक संस्था एकमेकांना माहितीची देवाण-घेवाण करू शकणार आहे.

Web Title: Bank accounts to be linked to Aadhar card by April 30 or face blockade: IT department