बँक कर्मचाऱ्यांचा 28 फेब्रुवारीला देशव्यापी संप 

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

या दोन गोष्टींशिवाय अनेक बँकांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळावर संचालकांच्या नियुक्ती संदर्भातील समस्या, प्रत्येक कॅडरमध्ये योग्य प्रमाणात नियुक्ती, ग्रॅच्युटीवरील बंधन हटविणे, सेवानिवृत्त लाभांवर प्राप्तिकरात सूट, निवृत्तीवेतन योजनांमध्ये सुधारणा आणि निवृत्त अधिकाऱ्यांचे प्रश्न अजून सोडविण्यात आलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

नवी दिल्ली - नोटाबंदीदरम्यान केलेल्या खर्चाची परतफेड करण्याच्या मुद्द्यावरुन देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी 28 फेब्रुवारी रोजी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जाणूनबुजून कर्ज थकविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

"नोटाबंदीनंतरच्या काळात आम्ही केलेल्या खर्चाची भरपाई सरकारने करुन द्यावी. या दोन महिन्यांमध्ये बँकांचा खर्च झाला असून व्यवसायाचे नुकसान झाले आहे. याचा बँकांच्या ताळेबंदावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि याचा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाच भार सहन करावा लागेल", असे मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनचे सरचिटणीस सी एच वेंकटाचालम यांनी व्यक्त केले.

नऊ बँक संघटनांनी संपात सहभागी होण्यास होकार दिल्याचे ते म्हणाले. या दोन गोष्टींशिवाय अनेक बँकांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि संचालक मंडळावर संचालकांच्या नियुक्ती संदर्भातील समस्या, प्रत्येक कॅडरमध्ये योग्य प्रमाणात नियुक्ती, ग्रॅच्युटीवरील बंधन हटविणे, सेवानिवृत्त लाभांवर प्राप्तिकरात सूट, निवृत्तीवेतन योजनांमध्ये सुधारणा आणि निवृत्त अधिकाऱ्यांचे प्रश्न अजून सोडविण्यात आलेले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: bank employee strike on 28 february