तुमच्या पैशांवर चांगलं व्याज मिळवायचं आहे? मग पर्याय आहे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा कंपनी एफडीवर अधिक व्याज मिळते.

प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा कंपनी एफडीवर अधिक व्याज मिळते.

आता बजाज फायनान्सच्या माध्यमातून एफडीवर सर्वाधिक म्हणजे 8.95 टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून नुकतेच रेपोदर कमी करण्यात आले आहे. सर्वत्र एफडीवर मिळणारे व्याज कमी झाले आहे. मात्र बजाज फायनान्सच्या एफडीवर अधिक व्याज मिळणार आहे. 

बऱ्याचदा गुंतवणूकदार विचार करतो की, एफडीच्या दरातील थोड्याशा फरकाने काय फरक पडतोय? मात्र एकदा एफडी कॅल्क्यूलेटरने नीट माहिती घेतल्यास कळेल की लहान फरक देखील आपल्यासाठी मोठा आहे. 

प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील एफडीपेक्षा कंपनी एफडीवर अधिक व्याज मिळते.

'स्मार्ट एफडी'बद्दल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. अधिक व्याज देणाऱ्या एफडी व्याजदराबद्दल खालील 7 गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

कंपनी एफडी देणार बँकेच्या 'एफडी'पेक्षा अधिक व्याज
मुदत ठेव अर्थात एफडी बँक किंवा नॉन-बँकिंग फायनान्समध्ये देखील करता येते. प्रत्येकाला बँकेतील एफडीबद्दल माहिती आहे. मात्र त्यातील सर्वोत्तम पर्याय आहे कंपनी एफडी. बँकेच्या एफडीपेक्षा कंपनीवर अधिक व्याज मिळते. बँकेच्या मुदत ठेवीवर जास्तीत जास्त 8 ते 8.25 टक्के व्याज मिळू शकते. मात्र बजाज फायनान्सच्या मुदत ठेवीवर एक कंपनी डिपॉझिट म्हणून 8 ते 8.95 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. जे बँकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा अधिक आहे. 

थोडे देखील खूप मोठे असते

व्याजदरातील अगदी 0.5 टक्क्याचा फरक देखील मिळणाऱ्या 'रिटर्न'वर खूप मोठा परिणाम करतात. बँकेतील आणि कंपनीतील एफडी व्याज दरांमधील थोड्याशा फरकाचा बदल लवकर लक्षात येत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या ठेवीवर 8.10 टक्क्याने व्याज मिळत असेल आणि बजाज फायनान्सच्या तीन वर्षांच्या आणि व्याज मुदतीअखेर मिळण्याच्या एफडीवर 8.60 टक्के व्याज मिळत असेल. तर व्याजदरातील 0.5 टक्क्यांचा फरक देखील दीर्घ मुदतीत 'रिटर्न'वर खूप परिणाम करू शकतो.

समजा 5 लाखांच्या मूळ गुंतवणुकीपासून सुरुवात केली आणि 5 वर्षे मुदतीचा पर्याय निवडला. ज्या ठेवीवर 8.10 टक्के व्याज मिळत असेल तर गुंतवणूक एकूण 7,38,071 होईल. परंतु  एफडीवर 8.60 टक्क्याने व्याज मिळत असेल तर ते 'रिटर्न' देईल .या व्याजदराने मुदतीअखेर 7,55,299 रुपये मिळतील. 

अधिक व्याजदरातून 'रिटायरमेंट'वेळी उभा करता येतो मोठा फंड

'रिटायरमेंट'च्या वेळी एक मोठा निवृत्ती फंड उभा करायचा असेल किंवा मुलाच्या परदेशी उच्च शिक्षणासाठी आर्थिक तजवीज करायची असेल  तर या दोन्हीही आर्थिक उद्दिष्टांसाठी उच्च आणि अधिक व्याज मिळणे गरजचे आहे. जेव्हा  एफडीमधील गुंतवणूक अधिक काळासाठी करता, समजा 20 वर्षे, तेव्हा अधिक व्याज दरामुळे अधिक आर्थिक लाभ मिळतात. तातडीच्या किंवा आकस्मिक गरजांसाठी हेच पैसे उपयोगी येतात. 

No photo description available.

एफडीचा व्याजदर मुदत आणि महिन्याला मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असते

बँकेत अथवा कंपनीमध्ये केलेल्या एफडीवर अधिक व्याज मिळविण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे जर एखादी एफडी तीन वर्षांसाठी केली असेल. आणि त्यावर दर महिन्याला व्याज घेत असल्यास परतावा कमी होतो. तुम्ही नवीन ग्राहक असाल तर बजाज फायनान्सच्या मुदत ठेवींवर तुम्हाला 8 टक्के या उच्च दराने व्याज मिळते. तीन वर्षांसाठी एफडी केली आणि रक्कम कालमर्यादा संपल्यानंतर संपूर्ण एफडीचे पैसे आणि व्याज घेतले तर   हा व्याज दर 8.60 टक्क्यांपर्यंत जातो. तुम्हाला व्याज नियमितपणे आणि वारंवार मिळण्याचा पर्याय असला तरी त्याची किंमत मोजावी लागते. व्याजाची रक्कम नियमितपणे हवी असेल तर मात्र व्याजदर घटतो. 

ज्येष्ठ नागरिकांना आणि सध्याच्या ग्राहकांसाठी अधिक व्याज

बजाज फायनान्सच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करताना सध्याचे ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदराचा लाभ मिळणार आहे . हे व्याज अनुक्रमे अनुक्रमे 0.25 टक्के ते 0.35 टक्के अधिक आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 8.95 टक्क्यांपर्यंत सर्वाधिक व्याज मिळू शकते. 

एफडी पुन्हा केल्यास 0.10 टक्के अधिक व्याज

बजाज फायनान्समध्ये एफडी केल्यानंतर तुम्हाला आणखी एका पद्धतीने अधिक व्याज मिळू शकते. म्हणजेच गुंतवणुकीची सवय लागावी आणि नियमित गुंतवणुकीला शिस्त मिळावी म्हणून बजाज फायनान्स 0.10 टक्के अधिक व्याज देते. बजाज फायनान्समध्ये केलेल्या एफडीचे पुन्हा नूतनीकरण केल्यास 0.10 टक्के अधिक व्याज मिळणार आहे. वाढलेल्या व्याज दरामुळे मुदतीअखेर अधिक रक्कम मिळते. ही रक्कम एखाद्या ट्रीपसाठी  किंवा अल्प-कालीन आर्थिक गरजांसाठी वापरू शकतो. 

एफडी चांगल्या ठिकाणी करा

एफडी करताना बँक अथवा कंपनी पारखून घेतली पाहिजे. कारण एफडी केल्यानंतर जर बँक किंवा कंपनी योग्य नसेल तर पैसे परत मिळणार नाही. किंवा एफडीमध्ये गुंतविलेले पैसे देखील त्यामुळे बुडू शकतात. बजाज फायनान्सच्या एफडीला ICRA या संस्थेने MAAA रेटिंग दिले असून CRISILने ठेवींना FAAA रेटिंग दिले गेले आहे. आपापल्या वर्गवारीत ही रेटिंग्ज सर्वोत्तम असल्याने त्यामधून निश्चित स्वरूपाचा परतावा मिळण्याची हमी असते. 

कशी कराल एफडी?

बजाज फायनान्समध्ये 'एफडी' गुंतवणूक ही अगदी सहज आणि सरळपणे केली जाऊ शकते. बजाज फायनान्सच्या प्रतिनिधीशी भेट ठरवून घेणे इतकेच तुम्हाला करायचे आहे. फोनवरून देखील संपर्क करू शकता. त्यामुळे उशीर करू नका...आजच एक एफडी सुरु करा आणि देशातील सर्वाधिक व्याज मिळवायला सुरुवात करा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank FDs or company deposits What should you opt for